उध्वस्त
निःशब्द झालो,एकाकी पण,नैराश्य आलं,
तिने मला जेंव्हा इथेच थांबुया म्हटलं,
भूतकाळातील त्या सुंदर क्षणांना,
आपण आता विसरायचं,
तिच्या शिवाय आयुष्य कसं जगायचं
कळत नसूनही तिच्यावरील प्रेमामुळे
तिच्या हो ला मी हो म्हटलं,
म्हणते ती भेटत राहू,स्वप्न मात्र एकेकटे पाहू
आयुष्य बघ कसं सोपं होईल, मला ती समजावते,
सगळं सांगावं लागायचं तिला,पण आता ती तिचं ठरवते,
तिला माहितीय,तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, पण आता माझ्या हातात काही नाही,
कारण आता मी तिला हो म्हटलं
आता दिवस जणू अंगावर येतो,
किशोर आणि रफी पण जाम रडवतो,
पूर्वी खूप छान वाटायचं त्यांना ऐकताना,
पण आता सर्व अर्थहीन झालंय,नको वाटतंय
कसं सांगू तिला सर्व काही,
कारण तिला तर मी आता हो म्हटलं,
कसं पाहू आता तिच्या पाणीदार डोळ्यात,
जी असायची जवळ दिवसा आणि रात्री स्वप्नात,
वागेन तिच्या मनासारखं आणि नाही दिसणार तिला मी,जेव्हा तिला मी नको असेल,
कारण आता मी तिला हो म्हटलं
असतील सर्वजण तिच्याजवळ,
जवळचे आणि लांबचे,मी मात्र नसेल,
बंधनात दिलेल्या शब्दांच्या,तिच्यावरील प्रेमाच्या,आता जवळ जाण्या कसा धजावेल,
आता फक्त दूर राहणे,स्वप्नात तिला पहाणे,
कारण आता तिला मी हो म्हटलंय
रोजची सकाळ,नवीन दिवस
सगळं तिच्यामुळे वाट पहायला लावणारे,
बोलणं तिचं,भेटणं तिचं,
आयुष्य भरभरून जगावं असं वाटणारे,
आता मात्र सगळं परकं झालंय,
तिला भेटणं पण कठीण झालंय,
कारण आता मी तिला हो म्हटलं
दिसते ती ऑनलाइन,माझ्याशी बोलत नाही
कसं जमतं तिला मला कळत नाही,
तिची अडचण समजते मला,माझी तिला नाही
मोगऱ्याचा गंध मला आता खुणावणार नाही,
कवितेचाही आता घेतोय निरोप,
तिचंही आता प्रयोजन नाही,कारण मी तिला हो म्हटलं
गेलो फिरायला कधी एकटा,तर एकटाच असतो,
कधी डोळे भरून येतात,तेंव्हा माझा मी नसतो,
तिची साथ होती तेंव्हा भरभरून जगावं असं वाटायचं,
पण आता नाही,कारण मी तिला हो म्हटलं

Khup sunder lihlay
ReplyDelete👌👌
ReplyDeleteभारी
ReplyDelete