उध्वस्त निःशब्द झालो,एकाकी पण,नैराश्य आलं, तिने मला जेंव्हा इथेच थांबुया म्हटलं, भूतकाळातील त्या सुंदर क्षणांना, आपण आता विसरायचं, तिच्या शिवाय आयुष्य कसं जगायचं कळत नसूनही तिच्यावरील प्रेमामुळे तिच्या हो ला मी हो म्हटलं, म्हणते ती भेटत राहू,स्वप्न मात्र एकेकटे पाहू आयुष्य बघ कसं सोपं होईल, मला ती समजावते, सगळं सांगावं लागायचं तिला,पण आता ती तिचं ठरवते, तिला माहितीय,तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, पण आता माझ्या हातात काही नाही, कारण आता मी तिला हो म्हटलं आता दिवस जणू अंगावर येतो, किशोर आणि रफी पण जाम रडवतो, पूर्वी खूप छान वाटायचं त्यांना ऐकताना, पण आता सर्व अर्थहीन झालंय,नको वाटतंय कसं सांगू तिला सर्व काही, कारण तिला तर मी आता हो म्हटलं, कसं पाहू आता तिच्या पाणीदार डोळ्यात, जी असायची जवळ दिवसा आणि रात्री स्वप्नात, वागेन तिच्या मनासारखं आणि नाही दिसणार तिला मी,जेव्हा तिला मी नको असेल, कारण आता मी तिला हो म्हटलं असतील सर्वजण तिच्याजवळ, जवळचे आणि लांबचे,मी मात्र नसेल, बंधनात दिलेल्या शब्दांच्या,तिच्यावरील प्रे...