Skip to main content

तिचा होकार

तुझं खरंय ग,होकार सोपा नसतो,
न देण्या आपलं जवळच काही जवळच्याला,
नकार पण सोपा नसतो

तिने नाही वेळ घेतला जरी
लवकर कबूल केलं नाही,
डोळ्यांची भाषा समजते ज्याला
समजण्या होकार लागत वेळ नाही

तिची भाषा वेगळी ,अवघड समजायला,
दमछाक झाली माझी, एकेक अर्थ लावायला
गेलो कामातून,लागलो कविता करायला
अर्थ समजवण्या, तिलाच त्या वाचून दाखवायला

अजब अशी ही जादू असते
जी न करता आपोआप होती दुसऱ्यावर
कळत नाही तिला वा त्याला
जीव जडतो लक्ष लागत नाही मग कशावर

आपण किती वेडे होतो ना
जेंव्हा एखाद्यावर प्रेम करतो ,
आपला आनंद,आपलं सुख
सगळंच तिच्या मर्जीवर सोडतो

नको ना आता अधांतरी राहणे,
एकमेकांचं अंदाज घेणं,
देऊन टाकूया आपण
प्रेमात देवू लागतं जे देणं
💐💐💐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एकटा

 

खामोशी

 

गुनहगार